Join us

पगार न दिल्याने व्यवस्थापकाला लुटले

By admin | Updated: November 16, 2015 03:00 IST

थकित पगार न दिल्याने क्लब व्यवस्थापकाला भररस्त्यात लुटल्याची धक्कादायक घटना कुर्ला येथे घडली. या प्रकरणी क्लबमधील बार टेंडर बॉयसह आठ जणांना कुर्ला पोलिसांनी अटक केली.

मुंबई : थकित पगार न दिल्याने क्लब व्यवस्थापकाला भररस्त्यात लुटल्याची धक्कादायक घटना कुर्ला येथे घडली. या प्रकरणी क्लबमधील बार टेंडर बॉयसह आठ जणांना कुर्ला पोलिसांनी अटक केली.कुर्ला पश्चिमेकडील मगर चौक येथील इक्वीन आॅफ बिझनेस पार्क क्लबमध्ये लॅन्की पियूष माहुंग (२९) व्यवस्थापक म्हणून काम करतात. अमित सिंग आणि निहिर देसाई यांच्या मालकीचा हा क्लब आहे. ते वांद्रे लिंकिंग रोड येथील बिग बॅग बारमध्ये असतात. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास माहुंग नेहमीप्रमाणे क्लबमध्ये जमा झालेली रक्कम घेऊन वांद्रे येथे निघाले, तेव्हा बार टेंडर बॉय म्हणून कामाला असलेला वैभव मराठे (२९) ने त्याच्या आठ साथीदारांसह कुर्ला-बीकेसी रोड येथे माहुंग यांच्या गाडीला अटकाव घातला. मराठेने सप्टेंबर महिन्यात नोकरी सोडली होती. ‘मेरे पगार का पैसा क्यू नही देगा’ असे बोलून वैभवसह त्याच्या साथीदारांनी हातातील हेल्मेटने माहुंगला मारहाण केली. त्यांच्याकडील १ लाख १० हजार रोकडसह दागिने आणि मोबाइल हिसकावून दोघा आरोपींनी पळ काढला. पेट्रोलिंग करत असलेल्या कुर्ला पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मराठेसह योगेश गायकवाड, रोहित शर्मा, प्रतीक काळेकर, प्रथमेश वाणी, प्रतीक घोसाळकरला ताब्यात घेतले. माहुंग आणि रॉयला भाभा रुग्णालयात दाखल केले. पसार दोघा आरोपींच्या रविवारी मुसक्या आवळण्यात आल्या. एसीपी श्रीरंग नाडगौडा, वरिष्ठ निरीक्षक एल.शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठेसह आठ जणांना अटक केली. अटक आरोपींकडून चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आल्याची माहिती नाडगौडा यांनी दिली. (प्रतिनिधी)