मुंबई : सोन्याचे दागिने घडवणा:या व्यापा:याचे अपहरण करून चार चोरटय़ांनी सुमारे अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला. काळाचौकी ते अॅन्टॉपहिल दरम्यान ही घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, रूपाराम भुरमल प्रजापती (39) हा व्यापारी आपला सहकारी रोशन शेखसोबत दुचाकीवरून काळाचौकी येथील घरून भायखळ्याच्या दिशेने निघाला होता. त्याच्यासोबत अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने होते.
काळाचौकी परिसरातच एक सुमो गाडी त्यांच्यासमोर येऊन थांबली. त्यातून उतरलेल्या तिघांनी प्रजापतीला सुमोत बसविले. अॅन्टॉपहिल येथे नेले. तेथे त्याच्याकडील सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावली. त्याला गाडीतून खाली ढकलले व पळ काढला.
चौथा आरोपी प्रजापतीची दुचाकी घेऊन पसार झाला. प्रजापतीवर पाळत ठेवून हा गुन्हा केल्याचा अंदाज पोलीस वर्तवित आहेत. (प्रतिनिधी)