Join us

SRA इमारतींची काळजी घ्या; बिल्डरांना मान्सूनपुर्व खबरदारी घेण्याच्या सुचना

By सचिन लुंगसे | Updated: May 24, 2024 18:05 IST

महापालिका, म्हाडाचा समावेश असून, आता एसआरएनेही मान्सूनपुर्व खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या आहेत.

मुंबई - ऐन पावसाळ्यात एसआरए इमारती कोसळून मनुष्यहानी होऊ नये म्हणून झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण सज्ज झाले असून, मान्सूनपुर्व खबरदारी घेण्याच्या सुचना प्राधिकरणाकडून बिल्डर आणि प्राधिकरणाच्या अभियंत्यांसह देण्यात आल्या आहेत.मुंबई शहर आणि उपनगरातील सर्वच प्राधिकरणांनी आता पावसाळीपूर्व कामांवर जोर दिला आहे. विशेषत: इमारतींशी निगडीत प्राधिकरणे ही कामे प्राधान्याने हाती घेत आहे. यात धोकादायक इमारतींची नावे जाहीर करण्यापासून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. यात महापालिका, म्हाडाचा समावेश असून, आता एसआरएनेही मान्सूनपुर्व खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या आहेत.

- संक्रमण शिबिरांमध्ये आवश्यक्तेनुसार खबदारी घ्यावी, त्यांचे बांधकाम नीट आहे ना ? ते तपासावे.- इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिकल साहित्य व्यवस्थित आहे ना ? हे तपासावे.- प्रकल्पस्थळी लावण्यात आलेले स्टील स्ट्रक्चर, होर्डिंग्ज व्यवस्थित आहेत का ? याची खबरदारी घ्यावी.

- पार्किंग स्ट्रक्चर तपासावे. नोंदणीकृत अभियंत्याकडून हे काम करावे.- जिथे जिथे स्ट्रक्चरल ऑडीटची गरज आहे ते कार्यकारी अभियंत्याच्या निगराणीखाली करावे.- प्रकल्पस्थळी लावण्यात आलेलया बॅरिगेटसच्या ठिकाणी सुरक्षा बाळगण्यात यावी.

- दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी खबरदारीची उपाय योजना करावी.- मान्सूनकाळात केलेल्या कामादरम्यान नागरिकांना त्रास होणारा नाही याची काळजी घ्यावी.- आरोग्य शिबिरे घेण्यात यावीत. धूर फवारणी करण्यात यावी.

- बिल्डरांनी या सगळ्या खबरदा-या घ्यावात. दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी.- प्रक्लपस्थळी कंत्राटदाराचे नाव, नंबर नमुद करावा.- प्राधिकरणाच्या अधिका-यांनी प्रकल्पस्थळांची पाहणी करावी आणि सुरक्षेचा आढावा घ्यावा.