Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत द चेंज मेकर्स’ पुरस्कार सोहळा रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 14:22 IST

५५ मान्यवरांचा करण्यात येणार गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विविध क्षेत्रांत नावलौकिक व स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ५५ मान्यवरांना ‘लोकमत द चेंज मेकर्स’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ५ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

‘लोकमत द चेंज मेकर्स’ पुरस्काराच्या पहिल्या आवृत्तीचा उद्देश अशा व्यक्ती, संस्थांचा गौरव करण्याचा आहे, ज्यांनी त्यांच्या कार्याद्वारे सेवा देत समाजाची स्थिती बदलण्यात योगदान दिले आहे. नामांकनांचे पुनरावलोकन करण्यासाठी संपादकीय मंडळाच्या ज्युरीद्वारे त्यांची निवड करण्यासाठी कठोर प्रक्रिया पार पाडली. पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या व्यक्तींचे प्रोफाइल प्रसिद्ध करण्यात आले आहेत, ज्यात गेल्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीत केलेल्या कामांचा समावेश आहे.

राहुल नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष), सुधीर मुनगंटीवार (वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री), गिरीश महाजन (जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री), उदय सामंत (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री), जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), चंद्रशेखर बावनकुळे (भाजप प्रदेशाध्यक्ष), आशिष शेलार (मुंबई भाजप अध्यक्ष), जितेंद्र आव्हाड (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस), भाई जगताप (मुंबई काँग्रेस अध्यक्ष), सुनील प्रभू (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, विधिमंडळ मुख्य प्रतोद), सचिन अहिर (उपनेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), प्रसाद लाड (भाजप, आमदार), विनोद घोसाळकर (उपनेता, शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे), डॉ. भारती लव्हेकर (भाजप, आमदार), केदार शिंदे (दिग्दर्शक - निर्माता), अंकुश चौधरी (अभिनेता), शिव ठाकरे  (टीव्ही पर्सनॅलिटी), सना शिंदे (नवोदित अभिनेत्री), आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण समारंभासोबत सांस्कृतिक कार्यक्रमही रंगणार आहेत.

टॅग्स :लोकमत