Join us  

मुंबईत पुन्हा एकदा ‘लोकमत’च अव्वल  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 7:00 AM

वाचकांच्या मनाचा वेध घेत त्याप्रमाणे अंकाची ठेवण करणाऱ्या आणि राज्याच्या कानाकोपºयातील बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवणा-या ‘लोकमत’ने मुंबईतही प्रथम क्रमांक कायम राखला आहे.

मुंबई : वाचकांच्या मनाचा वेध घेत त्याप्रमाणे अंकाची ठेवण करणाऱ्या आणि राज्याच्या कानाकोपºयातील बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवणा-या ‘लोकमत’नेमुंबईतही प्रथम क्रमांक कायम राखला आहे.सर्वाधिक खपाचे राष्ट्रीय दैनिक आणि महाराष्ट्राचा मानबिंदू अशी ओळख निर्माण केलेल्या ‘लोकमत’ने ‘आयआरएस २०१९ द2’च्या सर्वेक्षणानुसार, पुन्हा एकदा मुंबईतील नंबर एकचे मराठी वृत्तपत्र हे बिरुद प्राप्त केले आहे. सर्वेक्षणानुसार २७.३७ लाख मुंबईचे वाचकदररोज ‘लोकमत’ वाचतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘लोकमत’ या वृत्तपत्राची वाचक संख्या ६.४ टक्क्यांनी वाढली असून, आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबापुरीत ‘लोकमत’ने पुन्हा एकदा नंबर वन हे स्थान कायम राखले आहे.काय सांगते ‘आयआरएस २०१९ द2’चे सर्वेक्षण?‘लोकमत’च्या पुरुष वाचक संख्येत ९.५ टक्के वाढ‘लोकमत’च्या पुरुष वाचक संख्येत ९.५ टक्क्यांनी वाढ झाली असून, सद्य:स्थितीमध्ये हा आकडा १८ लाख ४२ हजार एवढा आहे. संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राचा विचार करता २ लाख ७ हजारांहून अधिक महिला ‘लोकमत’च्या वाचक असून, याच्या आसपास कोणतेही प्रतिस्पर्धी मराठी वर्तमानपत्र पोहोचलेले नाही.तरुणांचीही पहिली पसंती ‘लोकमत’च२० ते २९ या वयोगटातील तरुण वाचकांची संख्या वाढत असून, आजमितीस हा आकडा 14.1% एवढा आहे.यातही आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे ‘लोकमत’ तरुणाईच्याही पसंतीस उतरला असून, तरुण वर्ग ‘लोकमत’ वाचण्यास प्राधान्य देत आहे. सर्व मराठी वृत्तपत्रांच्या अग्रस्थानी ‘लोकमत’ असून, या वृत्तपत्राची वाचकसंख्या ८.१७ लाख एवढी आहे.निर्णायक वर्गातही लोकमत वाचकप्रियनिर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या ४० ते ४९ या तरुण वयोगटाचा विचार करता हा वर्गदेखील मोठ्या प्रमाणावर ‘लोकमत’चा वाचक आहे. या वयोगटातील ‘लोकमत’च्या वाचकांची संख्या 3,85,000 एवढी आहे. दरम्यान, डिजिटल जमान्यातही ‘लोकमत’ची वाचक संख्या केवळ कायम राहिलेली नाही तर त्यात वाढ झाली आहे. 9.7% वाढ झाली आहे.

टॅग्स :लोकमतमुंबई