Join us  

‘लोकमत इन्शुरन्स समिट २०१९’ एक अभिनव उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 2:51 AM

अधिक माहितीसाठी  www.lokmat-insurance.com येथे किंवा ७६२०९२३३०६/ ९१३७१२१६१६ येथे संपर्क साधावा.

लोकमत’द्वारे आयोजित ‘लोकमत इन्शुरन्स समिट’ हा एक अभिनव उपक्र म आहे. इन्शुरन्स क्षेत्रातील फसवणूक रोखण्यासाठी आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी ग्राहकांसमोर आणण्यासाठी, ‘लोकमत इन्शुरन्स समिट’ १९ सप्टेंबर रोजी सहारा स्टार हॉटेल येथे होणार आहे. स्टेट बँक आॅफ इंडिया लाइफ इन्शुरन्स प्रायोजित आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सद्वारे समिर्थत, ‘लोकमत इन्शुरन्स समिट’ हे महत्त्वाचे असे चर्चासत्र ठरणार आहे. या चर्चासत्रास एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह आॅफिसर विभा पडाळकर आणि बजाज आलियान्झचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह आॅफिसर तपन सिंघल, तसेच अनेक मान्यवर यांची उपस्थिती लाभेल.हक्कपात्र असलेल्या ग्राहकांना योग्यवेळी परतावा मिळण्यासाठीचे तंत्रज्ञान, सायबर सिक्युरिटी, माहिती तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर या उपक्रमांतर्गत अनेक परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. जागतिक स्तरावरील विमा कंपन्या आणि त्यांचे अधिकारी, विमा ब्रोकर, विमा एजन्सीज, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आणि इतर यांचादेखील सहभाग लाभणार आहे.सामाजिक बांधिलकी, सत्य परिस्थिीतीची जाण आणि उत्कृष्ट पत्रकारितेचा ठसा उमटवणाऱ्या ‘लोकमत’ या वर्तमानपत्राचे हे एक वेगळे पाऊल आहे. गेल्या काही दशकांत विमा कंपन्यांमध्ये होणारे फसवणुकीचे प्रकार ओळखून, लोकमत वृत्तपत्राने ही समस्या विमा कंपन्या, तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन केले आहे. लोकमत इन्शुरन्स समिट पुढाकार घेऊन ग्रामीण भागात जागरूकता पसरवून त्यांना विमा घेण्याचे महत्त्व आणि प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे.लोकमत इन्शुरन्स समिटमध्ये मुख्यत्वेकरून विमा स्वीकारणारी व्यक्ती किंवा कंपनी आणि विमा कंपन्यांमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान यावर परस्पर संवाद सत्रदेखील असेल. लोकमत इन्शुरन्स समिटची ही पहिली आवृत्ती ग्राहक, प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाद्वारे विमा कंपन्यांत होणारी फसवणूक टाळणे, यावर केंद्रित केली आहे.अधिक माहितीसाठी  www.lokmat-insurance.com येथे किंवा ७६२०९२३३०६/ ९१३७१२१६१६ येथे संपर्क साधावा.

टॅग्स :लोकमत