डोंबिवली : सीएसटीहून कल्याणला निघालेल्या एका लोकलमध्ये ठाणे स्थानकात आल्यानंतर अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. अनेकांनी गाडीतून फलाटात उतरत गाडी सोडण्याचा निर्णय घेतला. ही घटना सोमवारी संध्याकाळी ४.४०च्या सुमारास घडली. त्यामुळे स्थानकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.या लोकलच्या मागील बाजूच्या प्रथम श्रेणीच्या डब्यानजीकच धूर येऊ लागला. काही क्षणांतच धुराचे लोळ फलाटात आल्याने अन्य गाड्यांमधील प्रवासीही घाबरले. घटनास्थळी तातडीने प्रवाशांनी गर्दी केल्याने तेथून प्रवाशांना बाजूला करताना सुरक्षा रक्षकांच्या नाकीनऊ आले. स्थानक प्रबंधक एस. महिंदर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळली. ही लोकल स्थानकातून कल्याणला न धावता तेथेच रद्द करण्यात आली. तांत्रिक बिघाडाचे कारण देत ती लोकल कळवा कारशेड येथे पाठवण्यात येणार असल्याचे उद्घोषणा यंत्रावरून सूचित करण्यात आले.
लोकलला ठाण्यात आग
By admin | Updated: July 28, 2015 02:58 IST