Join us

मोबाइल चार्जिंग पॉइंटला आता लॉकरची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:22 IST

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोबाइल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पॉइंटची सुविधा उपलब्ध आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोबाइल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पॉइंटची सुविधा उपलब्ध आहे. आता या चार्जिंग पॉइंटसोबत लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोबाइल सुरक्षितरीत्या लॉकरमध्ये ठेवून चार्ज करता येणार आहे.मध्य रेल्वे मार्गावर २० डिजिटल मोबाइल चार्जिंग पॉइंट मशीन लावण्यात येणार आहेत. यापूर्वी भारतीय रेल्वेतील पहिली डिजिटल मोबाइल चार्जिंग पॉइंट मशीन पश्चिम रेल्वे मार्गावरील अहमदाबाद येथे लावण्यात आली. त्यानंतर आता पुणे विभागात दुसरी मशीन लावण्यात येणार आहे.२० डिजिटल मोबाइल चार्जिंग पॉइंट मशीनपैकी १० पुणे रेल्वे स्थानकांवर लावण्यात येणार आहेत. उर्वरित मशीन कोल्हापूर, मिरज, शिवाजीनगर, पिंपरी आणि चिंचवड या स्थानकांवर बसविण्यात येणार आहेत. तर, मुंबई विभागातही या मशीन बसविण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.