Join us  

लॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 3:10 AM

अलिबागसह लगतच्या स्थानिक पर्यटनस्थळांना पसंती

मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये घरी बसून कंटाळलेले नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या ३० टक्क्यांच्या आसपास आहे. या आकडेवारीची तुलना पाच महिन्यांपूर्वीच्या परिस्थितीशी करण्यात आली आहे.

अनलॉक ४ च्या टप्प्यात आलेल्या अनुभवाच्या आधारे आणि पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांच्या मिळालेल्या माहितीची नोंद करून पर्यटकांसाठी हॉटेल्स आॅनलाइन बुक करणाºया संकेतस्थळांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. विशेष म्हणजे, विरंगुळ्यासाठी घराबाहेर पडणारे मुंबईकर अलिबागसह लगतच्या स्थानिक पर्यटनस्थळांना पसंती देत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज्यातील प्रार्थनास्थळे बंद असली, तरी राज्याबाहेरील प्रार्थनास्थळे खुली होत आहेत. तेथे जाण्याकडेही नागरिकांचा कल असल्याचे निरीक्षणाअंती उघडकीस आले आहे.

लॉकडाऊनमुळे हॉटेल इंडस्ट्रीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पर्यटकांना हॉटेल्स आॅनलाइन बुक करून देणाºया संकेतस्थळांनाही आर्थिक नुकसानाची झळ बसली आहे. मुंबई महापालिकेसोबत काही संकेतस्थळांनी हातमिळविणी करून बाहेरगावहून मुंबईत दाखल होणाºया प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी सेवा उपलब्ध करून दिली आहे.सरकारचा मदतीचा हातकोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, नर्स आणि तत्सम कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याची सोय करता यावी, म्हणूनही आॅनलाइन हॉटेल्स बुक करणाºया काही संकेतस्थळांनी सेवा दिली आहे. याची रक्कम प्रशासनाने अदा केली आहे. यामुळे या व्यवसायाला उभारी घेण्यास काहीसा आधार मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअलिबागपर्यटन