Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबिवलीजवळ लोकलला ट्रकची धडक

By admin | Updated: February 19, 2015 02:11 IST

टिटवाळा-आंबिवलीदरम्यानच्या रेल्वे फाटक ाचे एक गेट उघडे असल्याने एका ट्रकला आसनगावहून सीएसटीला जाणाऱ्या लोकलने धडक दिली.

कल्याण : टिटवाळा-आंबिवलीदरम्यानच्या रेल्वे फाटक ाचे एक गेट उघडे असल्याने एका ट्रकला आसनगावहून सीएसटीला जाणाऱ्या लोकलने धडक दिली. ही घटना बुधवारी दुपारी ३च्या सुमारास घडली़ यात ट्रक पलटी झाला. मात्र ट्रक आणि ट्रेनमधील कोणीही जखमी झाले नाही़ ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले़ ट्रकमध्ये एक शिडी होती़ त्याद्वारे परिसरातील रेल्वेच्या दुरुस्तीचे काम सुरू होते़ अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त असले तरी त्यास दुजोरा मिळू शकला नाही़