माथेरान : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ज्याची प्रसिद्धी आहे, अशा माथेरानचे नंदनवन कसे होईल हे आजवरच्या सर्वच लोकप्रतिनिधींचे स्वप्न आहे, मात्र स्थानिक आणि लोकप्रतिनिधी यातील दुजाभाव मात्र विकास करायला आणि तो मान्य करायला मारक ठरत आहे. येथील सर्वपक्षीय नगरसेवकही पर्यटनाच्या दृष्टीने कार्य करीत असून स्थानिक मात्र त्याला अडथळा आणत असल्याची टीका आहे.प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी इथल्या पर्यटनाला गती देण्यासाठी, पर्यटन क्रांती घडविण्यासाठी, सर्वसामान्यांच्या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी, पर्यटन वाढीसाठी प्रांजळपणे प्रयत्न केलेले आहेत. यामध्ये रस्ते, शौचालये, मुताऱ्या, शटलसेवा, मिनी बससेवा, उद्यानांचे नेहमी सुशोभीकरण, सांस्कृतिक तथा पर्यटकांसाठी माथेरान महोत्सवाचे आयोजन, मनोरंजनाचे कार्यक्रम, घोड्यांची रेस, शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, पिसारनाथ मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन, इफ्तार पार्टी अशी एक ना अनेक कामे पर्यटकांच्या तसेच सर्वधर्मीय नागरिकांच्या एकोप्याच्या दृष्टीने सुरू आहेत. अमन लॉज ते माथेरान शटलसेवा ही पर्यटकांच्या वाढीसाठी सुरू केली तर यामुळे मोलमजुरांचा व्यवसाय मंदावला म्हणून घोडेवाले, रिक्षावाले यांची बोंब, धुळीचे प्रमाण नष्ट व्हावे याकरिता पेव्हर ब्लॉकचे रस्ते केले तर पेव्हरब्लॉकमुळे उन्हाळ्यात खूपच गरम होते म्हणून बोंब सुरूच आहे. (वार्ताहर)
माथेरानच्या विकासावर स्थानिकांची नाराजी कायम
By admin | Updated: April 5, 2015 22:17 IST