Join us

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत स्थानिक सुटी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2023 19:28 IST

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश.

श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवारी ६ डिसेंबर रोजी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना एक दिवसाची स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी  शासकीय परिपत्रक काढून ही माहिती दिली. महापरिनिर्वाण दिनी सुटी मिळावी, म्हणून महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.   मुंबईत महापरिनिर्वाण दिनी निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि तसेच शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अभिवादनासाठी शासकीय / निमशासकीय कार्यालयांना सुटी असावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीकडून अनेक वर्षांपासून सुरू होती. यंदा समितीने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, पूनम महाजन, आमदार कालिदास कोळंबकर, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, वर्षा गायकवाड आदींच्या माध्यमातून समन्वय समितीचे समन्वयक नागसेन कांबळे यांचा टीमने पाठपुरावा केला होता.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर