मुंबई : मध्य रेल्वेवरील परळ स्थानकात लोकल खोळंबल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कुर्ल्याच्या दिशेने जाणाºया लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे डाऊन धिम्या मार्गावरील लोकल सेवा पूर्णत: कोलमडली. यामुळे अप दिशेची वाहतूकदेखील काहीशा विलंबाने सुरू होती.सीएसटीएम-कुर्ला लोकलमध्ये परळ स्थानकात सकाळी ९ वाजताच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. परिणामी लोकल परळ स्थानकात खोळंबून राहिली. पिक अवर असल्यामुळे स्थानकांवर गर्दी वाढत गेली. सुमारे २० मिनिटांनंतर ही लोकल सुरू झाली. या बिघाडामुळे अप दिशेकडील वाहतुकीवरही परिणाम झाला. बिघाड झालेली लोकल दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात आली. त्यानंतर ती कारशेडमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
परळ स्थानकात लोकल खोळंबा, प्रवाशांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 05:52 IST