Join us

कर्जत-खोपोली मार्गावर ४ तास लोकल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:54 IST

कर्जत-खोपोली स्थानकां दरम्यान रेल्वेसंबंधी उन्नतीकरणाच्या कामांसाठी शनिवार आणि रविवार सकाळी ४ तास वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

मुंबई : कर्जत-खोपोली स्थानकां दरम्यान रेल्वेसंबंधी उन्नतीकरणाच्या कामांसाठी शनिवार आणि रविवार सकाळी ४ तास वाहतूक बंद करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मान्सूनपूर्व तयारी आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी ही कामे सुरू राहणार आहेत.कर्जत-खोपोली स्थानकांदरम्यान पळसदरी स्थानक परिसरात मध्य रेल्वे रुळ दुरुस्तीसह विविध कामे करणार आहे. यासाठी सलग दोन दिवस सकाळच्या वेळेतील लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. या काळात कर्जत येथून खोपोलीकडे जाणारी १०.४० आणि ११.५५ वाजताची लोकल रद्द करण्यात येईल. खोपोली येथून कर्जत दिशेला जाणारी १०.००, ११.२० आणि १२.४० मिनिटांची लोकलही रद्द करण्यात येणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दोन्ही दिवस सकाळी सुटणारी ७ वाजून ३० मिनिटांची खोपोली लोकल कर्जत स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.

टॅग्स :लोकल