Join us

एलएलबी सत्र ९ परीक्षेचा निकाल जाहीर; १,५४९ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण

By रेश्मा शिवडेकर | Updated: February 29, 2024 19:19 IST

या परीक्षेला १,६९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या हिवाळी सत्राच्या विधी अभ्यासक्रमाच्या पाच वर्षीय एलएलबी (६०:४०) सत्र ९ च्या डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

एलएलबी सत्र ९ च्या परीक्षेमध्ये एकूण १,५४९ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १,६९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,६८८ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर ११५ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ११५ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत.

एलएलबी सत्र ९ चा निकाल ९३.०९ टक्के लागला आहे. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ