Join us
Daily Top 2Weekly Top 5

लिटील चॅम्प मुग्धाला ९४.२० टक्के

By admin | Updated: June 8, 2015 23:15 IST

महाराष्ट्रातील रसिकांवर आपल्या सुमधुर आवाजाची भुरळ घालणा-या मुग्धा वैशंपायनला एसएससी परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळाले आहेत.

अलिबाग : इयत्ता चौथीत असताना सारेगम लिटील चॅम्प हा गौरव संपादन करुन उभ्या महाराष्ट्रातील रसिकांवर आपल्या सुमधुर आवाजाची भुरळ घालणाऱ्या कोकण एज्युकेशन सोसायटीच्या जा.र.ह.कन्या शाळेच्या मुग्धा वैशंपायनला एसएससी परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळाले आहेत. विज्ञान आणि गणितात विशेष रुची असलेल्या मुग्धाला कोणत्याही परिस्थितीत गाणे आणि रियाज अबाधित राखायचा आहे. नेमके काय करायचे आहे हे पक्के नसले तरी येत्या दोन - चार दिवसात निर्णय घेणार असल्याचे मुग्धाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुग्धाच्या या यशाने आई भाग्यश्री, वडील भगवान, सर्व कुटुंबीय आणि शाळेतील शिक्षकवृंद अगदी सुखावून गेला आहे.पाटील माध्यमिकचा निकाल ९६.०७ %आगरदांडा : प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळा मिठागरमध्ये दहावीचा निकाल ९६.०७ टक्के लागला आहे. शाळेतील प्रांजली बैकरने ८९.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, सुजित मिसाळने ८६.६० टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. ------------मराठी मुलींचा उर्दूत झेंडाबोर्ली-पंचतन : मार्च २०१५ मध्ये आयसीएसई या दिल्ली बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेत बोर्ली पंचतन, ता. श्रीवर्धन, रायगड येथील डॉ. ए. आर. उंड्रे हायस्कूल विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला असून यामध्ये उर्दू या विषयामध्ये प्रथम अस्सल मराठी मुलींनी प्रावीण्य प्राप्त केले आहे. यामध्ये समृद्धी वाघमारे १०० पैकी ९० गुण मिळवून उर्दू विषयात प्रथम येण्याचा मान पटकावला. मार्च २०१५ च्या दिल्ली बोर्डाच्या परीक्षेमध्ये डॉ. ए. आर. उंड्रे इंग्लिश मिडिमय स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. हर्षदा येरपले ८६ गुण व सिमरन करंबे ८६ गुण या दोन मराठी मुलींनीही उर्दूत विशेष प्रावीण्य प्राप्त केले. त्याचबरोबर क्षितीज खोपकर ५० गुण असे प्राप्त झाले आहेत. -------------रायगडमध्ये यावर्षीही मुलींचीच बाजीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने मार्च २०१५ मध्ये घेतलेल्या दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला. यात राज्याचा सरासरी निकाल ९१.४६ टक्के लागला असून त्यात कोकण विभागाचा निकाल ९६.५४ टक्के असा सर्वाधिक आहे. मुंबई विभागाचा निकाल ९२.९० टक्के लागला असून, या विभागात येणाऱ्या रायगड जिल्ह्याचा निकाल ९३.५० टक्के लागला आहे. बारावी परीक्षेच्या निकालाप्रमाणेच दहावी शालान्त परीक्षेत देखील जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे.जिल्ह्यातील एकूण ५१३ शाळांमधील ३८ हजार २२७ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी फॉर्म भरले होते. त्यापैकी ३८ हजार १५४ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले. त्यात १९ हजार ६४५ मुले तर १८ हजार ५०९ मुलींचा समावेश होता. एकूण परीक्षार्थीपैकी उत्तीर्ण झालेल्या ३५ हजार ६७४ परीक्षार्थीपैकी ९२.४८ टक्के म्हणजे १८ हजार १६७ मुले तर ९४.५९ टक्के म्हणजे १७ हजार ५०७ मुली आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ५१.८५ टक्के लागला असून एकूण ४ हजार ३६१ होते, त्यापैकी २ हजार २६१ उत्तीर्ण झाले आहेत.