Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘लितराती’त साहित्याची देवाण-घेवाण

By admin | Updated: January 13, 2017 07:10 IST

चेंबूरमधील विवेकानंद एज्युकेशन सोसायटी आॅफ मॅनेजमेंटमध्ये नुकताच ‘लितराती महोत्सव’

मुंबई : चेंबूरमधील विवेकानंद एज्युकेशन सोसायटी आॅफ मॅनेजमेंटमध्ये नुकताच ‘लितराती महोत्सव’ पार पडला. या दोन दिवसीय महोत्सवाला ४५ साहित्यिकांसह विचारवंतांनी हजेरी लावली. या महोत्सवात तरुण पिढीची नाळ पुन्हा साहित्याशी जोडण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची मदत घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले. ‘लोकमत’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिकी बांधिलकीही जपण्यात आली. शिवाय, या महोत्सवाच्या माध्यमातून विविध प्रदेशांतील साहित्याची देवाण-घेवाण करण्यात आली. विजय चौथिवाला, सुदीप नगरकर, राकेश खार, सावी शर्मा, मंजू लोढा, जुबानश्वा मिश्रा, नीता लुल्ला, अभिजित भट्टाचार्य, पूर्णिमा बाहल, नीता लेखी, प्रीती गांधी, या मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. विवेकानंद एज्युकेशन सोसायटी आॅफ मॅनेजमेंटचे संचालक सतीश मोढ यांनी महोत्सवाविषयी सांगितले की, भविष्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता समोर येणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. (प्रतिनिधी)