Join us
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या पात्र चालकांची यादी संकेतस्थळावर

By admin | Updated: June 12, 2014 01:51 IST

राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे विभागात सरळसेवा पद्धतीने घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत पात्र मेदवारांची यादी डब्लूडब्लूडब्लू डॉट महाएसटी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आली आहे

ठाणे : राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे विभागात सरळसेवा पद्धतीने २३ मार्च २०१४ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी डब्लूडब्लूडब्लू डॉट महाएसटी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आली आहे. या यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांना १६ जून ते ३ जुलै २०१४ या कालावधीत राज्य परिवहन विभागाच्या वंदना सिनेमा समोरील ठाणे पाचपाखाडी येथे शारिरीक पात्रता तसेच कागदपत्र छाननीसाठी बोलविण्यात आले आहे. तरी संकेतस्थळावरील यादीत समाविष्ठ असलेल्या उमेदवारांनी प्राथमिक छाननीच्या कार्यक्रमाची माहिती या संकेतस्थळावर पहावी, असे आवाहन एसटीच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे.(प्रतिनिधी)