Join us

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर

By admin | Updated: December 29, 2016 16:14 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 45 उमेदावारांचा समावेश आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - महापालिका निवडणुकीच्या तारखा अजून घोषित झालेल्या नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसलेली दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 45 उमेदावारांचा समावेश आहे. या यादीमध्ये डॉक्टर आणि वकिलांचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. निवडणुकीत काँग्रेससोबत युतीची शक्यता कमी असल्याचंही यावेळी सचिन अहिर यांनी सांगितलं आहे.