Join us
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथांची यादी संकेतस्थळावर

By admin | Updated: January 23, 2017 05:59 IST

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून ४१ वी ग्रंथभेट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी

मुंबई : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून ४१ वी ग्रंथभेट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी २०१४ला प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड केलेल्या ४१६ ग्रंथांची यादी या ६६६.ङ्मि’.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल संकेतस्थळावर २१ ते ३१ जानेवारी अवलोकनार्थ खुली ठेवली आहे. यामध्ये मराठी ३३५, हिंदी ४५, तसेच इंग्रजी भाषेतील ३६ ग्रंथांचा समावेश आहे. या संदर्भात सूचना, हरकती, आक्षेप ३१ जानेवारीपर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई-२३, यांच्याकडे लेखी स्वरूपात असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)