Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीएफसाठीची मर्यादा 65क्क् रुपयेच

By admin | Updated: June 3, 2014 00:39 IST

ज्या संस्था या नियमापेक्षा अधिक रक्कम भरत असतील,त्यांना ही वाढीव रक्कम केव्हाही कमी करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये मूळ पगाराच्या 12 टक्के अथवा रुपये 65क्क् यापैकी जी रक्कम कमी असेल तीच भरावी लागेल. ज्या संस्था या नियमापेक्षा अधिक रक्कम भरत असतील,त्यांना ही वाढीव रक्कम केव्हाही कमी करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. कायद्यानुसार मूळ पगाराच्या 12 टक्के (कर्मचारी आणि मालक मिळून) रक्कम भविष्य निर्वाह निधी म्हणून कापली जाते.असे असले तरी त्यासाठी रुपये 65क्क् अशी उच्चतम मर्यादा लागू आहे. काही कंपन्या या कायदेशीर मर्यादेहून अधिक रक्कम कपात करीत असल्या तरी ही वाढीव कपात केंव्हाही थांबविण्याचा हक्क संबंधित कंपनीला असल्याचे या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
 या संदर्भात सन 2क्11 मध्ये मराठवाडा ग्रामीण बॅँक कर्मचारी आणि इतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार ही अधिसूचना काढण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निकालाला संघटन आव्हान देणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणो निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्याबाबत कोणावरही सक्ती न करण्याच्या सूचना सर्व कर्मचा:यांना दिल्याचे संघटनने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)