Join us

विजेचा खेळखंडोबा

By admin | Updated: June 25, 2015 03:00 IST

ढिसाळ कारभारामुळे विजेचा खेळखंडोबा झाला आहे. पावसाळ््यापूर्वीची कामे नीट न केल्यामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणाऱ्या संततधार पावसामुळे या समस्या

नवी मुंबई/ पनवेल/ उरण : नवी मुंबई आणि परिसरातील रहिवासी सध्या विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे विजेचा खेळखंडोबा झाला आहे. पावसाळ््यापूर्वीची कामे नीट न केल्यामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणाऱ्या संततधार पावसामुळे या समस्या उद्भवल्या आहेत. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाडच्वाशीत एप्रिल महिन्यापासून सेक्टर ९, १५, १६ ए परिसरातील सर्वच भागात महावितरणाचा खेळखंडोबा सुरू आहे. आठवड्यातील दोन ते तीन दिवस एक तासाहून अधिक वेळ वीजपुरवठा खंडित केला जातो. या परिसरातील रहिवाशांनी महावितरणाच्या हलगर्जीपणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. च्उकाड्याच्या दिवसात एप्रिल आणि मे महिन्यात सेक्टर नऊमधील नागरिकांना कित्येक तास विजेविना काढावे लागले. अनेकदा तक्रार करूनही महावितरणाकडून दखल घेतली गेली नाही. आता पावसाळा सुरू झाला असूनही परिस्थिती कायम आहे. कधी कोणत्या क्षणाला वीजपुरवठा खंडित होईल याचा अंदाज नसल्याने रहिवाशांची तारांबळ उडते आहे.च्ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला असूनही ते बदलले जात नाहीत. काही ठिकाणचे फ्युज निकामी झाल्याची माहितीही इथल्या नागरिकांनी दिली. या परिसरातील सर्वच विद्युतवाहिन्यांकडे महावितरणाने जातीने लक्ष घातले पाहिजे, तसेच दोन महिन्यांपासून सुरू असलेली ही विजेची समस्या लवकरात लवकर सोडविली पाहिजे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.