मुंबई : मुंबईतील अनेक चौपाट्यांवर गणेश विसर्जन करण्यात येत असल्याने राज्य सरकारने व मुंबई महापालिकेने चौपाट्यांवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेसे जीवनरक्षक व आवश्यक त्या सुविधा युद्धपातळीवर उपलब्ध कराव्यात, असे निर्देश गुरुवारी उच्च न्यायालयाने सरकारला व महापालिकेला दिले.चौपाट्या सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करत राज्य सरकारने ८ सप्टेंबर २००६ रोजी अधिसूचना काढली. परंतु, अंमलबजावणी न केल्याने जनहित मंच या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. आर. डी. धानुका यांच्या खंडपीठापुढे होती.गणेश विसर्जनाकरिता मुंबईतील चौपाट्यांवर ९४ जीवनरक्षक नेमण्यात आले असून त्यापैकी ९० जीवनरक्षक कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करण्यात आल्याची माहिती मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी उच्च न्यायालयाला दिली.
चौपाट्यांवर जीवनरक्षक नेमा
By admin | Updated: September 9, 2016 03:38 IST