Join us
Daily Top 2Weekly Top 5

वहिणीची हत्या करणा-या दिराला जन्मठेप

By admin | Updated: April 27, 2017 13:46 IST

पाथरी येथील वृंदा सुनील पाटील यांच्या हत्ये प्रकरणी मृत महिलेचादीर संजय पाटील याला सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 27 -  पाथरी येथील वृंदा सुनील पाटील यांच्या हत्ये प्रकरणी मृत महिलेचादीर संजय पाटील याला सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 
20 ऑगस्ट 2015 रोजी आरोपीने वृंदा पाटील यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारले होते. त्यानंतर पोलीस पाटील संजीव लंगरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
 
या प्रकरणी न्यायालयात एकूण 10 साक्षीदार तपासले व गुरुवारी या प्रकरणाचा निकाल लागला. यामध्ये आरोपी संजय शिवराम पाटील याला भादंवि कलम 302 नुसार जन्मठेपेसह 10 हजार रुपये दंड, दंडाची रक्कम जमा न केल्यास 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. 
 
सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर आरोपी तर्फे अॅड. सत्यजित पाटील यांनी काम पाहिले.