Join us
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाचा आनंद घेतेय विद्या

By admin | Updated: June 10, 2014 00:04 IST

‘बॉबी जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या विद्या बालनच्या मते, ती सध्या तिच्या जीवनाचा आनंद घेत आहे.

‘बॉबी जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या विद्या बालनच्या मते, ती सध्या तिच्या जीवनाचा आनंद घेत आहे. विद्याने 2क्12 मध्ये सिद्धार्थ राय कपूरसोबत लगA केले असून ती तिच्या वैवाहिक आयुष्यात खुश आहे. विद्या म्हणाली, आधी माङयासाठी फक्त कामच होते. आता मी एंजॉय करायला शिकले आहे. माझी आई म्हणते की, जन्मले ते एक बाई म्हणून, पण आता मुलगी बनले आहे.’ विद्या पुढे म्हणाली , ‘मला लहानपणापासूनच काही तरी वेगळे करण्याची इच्छा होती. मी तेव्हा खूप गंभीर होते. काही करायचे होते; पण मार्ग सापडत नव्हता. माङो कुटुंबीय, शेजारी, नातेवाईक कोणाचाही फिल्मी दुनियेशी संबंध नव्हता. जेव्हा मी माङया आई-वडिलांना अभिनेत्री बनण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा त्यांना वाटले की, ही इच्छा सर्वच मुलींची असते. त्यानंतर मी छोटी-छोटी कामं केली. खूप संघर्षानंतर मला यश मिळाले, तेव्हा जीवनाचा आनंद घेण्याची संधीच मिळाली नाही, लगAानंतर अशी संधी मला मिळाली आहे.’