Join us
Daily Top 2Weekly Top 5

मामाच्या गावाला जाऊया!

By admin | Updated: November 21, 2014 00:16 IST

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांच्या संस्कारापासून दुरावलेल्या लहान मुलांकडे लक्ष द्यायला नोकरदार आई-बाबांना वेळ मिळत नाही.

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांच्या संस्कारापासून दुरावलेल्या लहान मुलांकडे लक्ष द्यायला नोकरदार आई-बाबांना वेळ मिळत नाही. आजच्या मानसिकतेला नातेसंबंधातील ओलावा तसेच निसर्गाबाबतीत सजग करणे ही काळाची गरज आहे. हाच धागा पकडून ‘मामाच्या गावाला जाऊया’ ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मामाच्या ओढीने निघालेल्या उच्चभ्रू कुटुंबातील तीन निरागस भावंडांच्या साहसी जंगल सफरीचा आनंद प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळणार आहे. पंचवीस दिवस संपूर्ण जंगलात शुटींग झालेला हा पहिला मराठी सिनेमा आहे.या चित्रपटात अभिनेता अभिजीत खांडकेकर, मृण्मयी देशपांडे यांच्यासह बालकलाकार शुभंकर अत्रे, साहिल मालगे आणि आर्या भरगुडे यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत.