Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नांपेक्षा उत्तरासाठी भांडू या; समस्या उपयासह मांडू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांना एकत्र आणण्याचा एक प्रयत्न बालक पालक या मुक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांना एकत्र आणण्याचा एक प्रयत्न बालक पालक या मुक्त व्यासपीठाच्या निमित्ताने झाला असून, सुमारे आठ हजार जणांनी यास स्वीकारले आहे. आता यास थोडे व्यापक स्वरूप देण्याचा विचार पुढे आला आणि बालक पालक फाउंडेशन या सेवाभावी सामाजिक संस्थेची नोंदणीकृत स्थापना झाली असून, पालक- विद्यार्थी- शिक्षक यापैकी कोणत्याही भूमिकेतून एकमेकांना या व्यासपीठाद्वारे व्यापक स्तरावर जोडलेले राहावे, अशी संस्थेची इच्छा आहे. यात सुसूत्रता असावी यासाठी विनामूल्य ऑनलाइन नावनोंदणी करून बालक पालक फाउंडेशनमध्ये क्षमतेनुसार सक्रिय होण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. दरम्यान, बालक पालक या मुक्त व्यासपीठाच्या निमित्ताने कार्यशाळा, संवादसत्रे, कृतिसत्रे, व्याख्याने आणि मुलांसाठी वैविध्यपूर्ण स्पर्धा आयोजित करून संवादातून सुसंवाद ऑनलाइन पद्धतीने साधण्याच्या प्रयत्नांचेही चांगले स्वागत झाले आहे.