Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतीचा जबाब दोन-तीन दिवसांत नोदवणार

By admin | Updated: June 21, 2014 00:09 IST

अभिनेत्री प्रीती झिंटाचा पुरवणी जबाब रविवारी सायंकाळी किंवा सोमवारी सकाळी मरिन ड्राइव्ह पोलीस नोंदवतील, अशी शक्यता आहे.

नेस-प्रीती प्रकरण : लॉस एन्जेलीसहून मुंबईला झाली रवानामुंबई : अभिनेत्री प्रीती झिंटाचा पुरवणी जबाब रविवारी सायंकाळी किंवा सोमवारी सकाळी मरिन ड्राइव्ह पोलीस नोंदवतील, अशी शक्यता आहे. प्रीती लॉस एन्जेलीसहून मुंबईला येण्यासाठी निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस उपायुक्त रविंद्र शिसवे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.पुरवणी जबाब नोंदविताना मरिनड्राईव्ह पोलीस प्रामुख्याने ३० मे रोजी वानखेडे स्टेडीयममध्ये तीन टप्प्यांमध्ये घडलेला प्रसंग प्रीतीकडून तपशीलवार समजावून घेणार आहेत. याशिवाय घटना ३० मे रोजी ही घटना घडूनही तक्रार द्यायला इतका उशीर का, याचीही चौकशी पोलीस प्रीतीकडे करणार, असे समजते.या प्रकरणी प्रीतीची बाजू घेत गँगस्टर रवी पुजारीने वाडिया कुटुंबियांना धमक्या दिल्या. त्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असला तरी मरिनड्राईव्ह पोलीस या धमक्यांबाबतही प्रीतीकडे चौकशी करू शकतात. (प्रतिनिधी)