मुंबई : देशात गोहत्याबंदी कायदा लागू करण्यात यावा, करण्यात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम (स्वामी) यांनी महासंघाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त बोलताना सांगितले.उज्जैन येथे साजरा झालेल्या वर्धापन दिन सोहळ््याला देशभरातून महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. या सोहळ््यासाठी उज्जैन पीठाचे जगदगुरू श्री श्री श्री १््८ सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीची उपस्थित होते. त्याचबरोबर सद्गुरू नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, महादेव शिवाचार्य महाराज, औसेकर महाराज हेही उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमार स्वामी गणाचार्य, जगन्नाथ करंजे, शिवानंद मथड, विजय कलमठ, दिनदयाळ जंगम यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
‘गोहत्याबंदीसाठी कायदा व्हावा’
By admin | Updated: January 24, 2015 01:02 IST