Join us

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पाचशेपेक्षा कमी रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:06 IST

४६६ कोरोना बाधित; १२ मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. शनिवारी ...

४६६ कोरोना बाधित; १२ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी पाचशेहून कमी बाधित रुग्णांची नोंद झाली. ४६६ नवीन रुग्ण सापडले असून, १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०७ टक्के एवढा खाली आला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ९९३ दिवसांवर पोहोचला आहे.

आतापर्यंत मुंबईत सात लाख ३० हजार ७०७ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख सहा हजार ४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ६९० रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सहा हजार ६१८ सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी मृत्युमुखी पडलेल्या १२ रुग्णांपैकी पाच रुग्णांना सहव्याधी होत्या.

मृतांमध्ये सात पुरुष, तर पाच महिला रुग्णांचा समावेश होता. १० मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर दोन रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. दिवसभरात ३३ हजार ४८० कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ७७ लाख ३३ हजार ८७९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.