Join us

मुंबईत १२ रुग्णांचा लेप्टोने मृत्यू

By admin | Updated: July 8, 2015 00:36 IST

जून महिन्याच्या शेवटी पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. १ ते ७ जुलैदरम्यान लेप्टोमुळे १२ जणांचा बळी गेला असून, २१ लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई : जून महिन्याच्या शेवटी पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. १ ते ७ जुलैदरम्यान लेप्टोमुळे १२ जणांचा बळी गेला असून, २१ लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांपैकी ६० टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे महापालिकेने मुंबईकरांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर, सातरस्ता या परिसरातील रुग्ण लेप्टोमुळे दगावले आहेत. मालाड परिसरातील ४, कांदिवलीतील ३, दहिसर आणि बोरीवली येथील २ आणि सातरस्ता येथील १ रुग्ण लेप्टोमुळे गेल्या पाच दिवसांमध्ये मृत्युमुखी पडला आहे.