मुंबई : या पावसाळ्यातील लेप्टोस्पायरसिसचा पहिला बळी गेल्याची घटना मुंबईत घडली. वडाळा येथे राहणा:या एका 41 वर्षीय व्यक्तीला 12 जुलैपासून थंडीताप येत होता. ताप अधिकच वाढल्याने त्याला भाभा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या अन्य वैद्यकीय चाचण्या कस्तुरबा लॅबमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीत लेप्टो झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र व्हेंटिलेटरवर असलेल्या या रुग्णाचा 22 जुलै रोजी मृत्यू झाला. (प्रतिनिधी)