Join us  

वैधानिक समित्यांमध्ये वाढली सेनेची ताकद, समान संख्याबळामुळे खडाजंगी थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 4:39 AM

मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्तेबरोबरच वैधानिक समित्यांमधील ताकदही वाढवली आहे. महापालिकेची आर्थिक नाडी, जमिनींच्या व्यवहाराचे निर्णय घेणाºया या महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढले.

मुंबई : मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्तेबरोबरच वैधानिक समित्यांमधील ताकदही वाढवली आहे. महापालिकेची आर्थिक नाडी, जमिनींच्या व्यवहाराचे निर्णय घेणाºया या महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढले. तर मनसेचे समित्यांमधील अस्तित्व संपल्यामुळे विरोधी पक्षांची ताकद आणखी कमी झाली आहे. परिणामी, समान संख्याबळामुळे याआधी समित्यांमध्ये रंगणारी खडाजंगी थंडावणार आहे.पालिकेत सेनेची सत्ता काठावर असल्याने भाजपाकडून त्यांना कायम धोका होता. सेनेचे ८४, तर भाजपाचे ८२ संख्याबळ असल्याने प्रत्येक समित्यांमध्ये भाजपा शिवसेनेच्या बरोबरीनेच होती. पहारेकºयांच्या भूमिकेतील भाजपाकडून शिवसेनेची कोंडी केली जात होती. त्यात भांडुपच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाल्याने शिवसेनेची सत्ता अडचणीत आली. धास्तावलेल्या शिवसेनेच्या गोटात वेगाने चक्र फिरले आणि मनसेच्या सहा नगरसेवकांना आपल्या पक्षाकडे फिरवण्यात त्यांना यश आले. त्यामुळे सेनेचे संख्याबळ ९१ झाले आहे. भाजपाकडून पुढच्या हालचाली होईपर्यंत सेनेच्या सत्तेला धोका नाही. वैधानिक समित्यांमध्ये सेनेच्या मागे असलेला भाजपाचा ससेमीरा संपेल. तसेच अनेक प्रस्ताव त्यांना स्वबळावर मंजूर करता येतील.असे आहे समित्यांवरील संख्याबळस्थायी समितीएकूण सदस्य २७शिवसेना १२भाजपा १०काँग्रेस ०३राष्ट्रवादी ०१समाजवादी ०१शिक्षण समितीएकूण सदस्य २२बिगर सदस्य ०४शिवसेना १२भाजपा ०९काँग्रेस ०४राष्ट्रवादी ०१सुधार समितीएकूण सदस्य २६शिवसेना ११भाजपा १०काँग्रेस ०३राष्ट्रवादी ०१समाजवादी ०१बेस्ट समितीएकूण सदस्य १६शिवसेना ०८भाजपा ०६काँग्रेस ०२राष्ट्रवादी ०१

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशिवसेनाभाजपा