Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडल्याने चाकूहल्ला

By admin | Updated: March 19, 2016 01:25 IST

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडल्याच्या रागाने भाजपा कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. ही घटना गोरेगावच्या दिंडोशी परिसरात गुरुवारी रात्री घडली. दिंडोशी पोलिसांनी

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडल्याच्या रागाने भाजपा कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. ही घटना गोरेगावच्या दिंडोशी परिसरात गुरुवारी रात्री घडली. दिंडोशी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे .भाजपाच्या कार्यकर्त्यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. गुरुवारी रात्री या ग्रुपवर काही विषयांवर चर्चा सुरू असताना यातील एक सदस्य संदीप उपाध्याय याने ‘हा ग्रुप मी सोडत आहे. मला यात काही रुची नाही’, असे त्या ग्रुपच्या अ‍ॅडमिनला सांगितले. तेव्हा त्याने ‘तू ग्रुप सोडू नकोस, तू पळपुटा आहेस’, असे म्हटल्याने उपाध्यायने तो ग्रुप सोडला. याचा राग त्या ग्रुपमध्ये असलेल्या सचिन पांडे याला आला. नेमके त्याच रात्री हे दोघे गोरेगाव पूर्वच्या ओबेरॉय मॉलसमोर भेटले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. त्या वेळी पांडेसह त्याच्या चार मित्रांनी उपाध्यावर चाकू हल्ला केला.