Join us

वाहतूककोंडी फोडण्यासाठी जागा सोडा

By admin | Updated: May 10, 2016 02:17 IST

नवीन इमारत अथवा इमारतींचा पुनर्विकास करताना अनेक वेळा नियम धाब्यावर बसविले जातात़ यामुळे वाहतुकीची मोठी समस्या मुंबई शहरात निर्माण झाली आहे़

मुंबई : नवीन इमारत अथवा इमारतींचा पुनर्विकास करताना अनेक वेळा नियम धाब्यावर बसविले जातात़ यामुळे वाहतुकीची मोठी समस्या मुंबई शहरात निर्माण झाली आहे़ सुधारित विकास नियोजन आराखड्यात याची दखल घेण्यात आली आहे़ त्यानुसार, इमारतींचा पुनर्विकास करताना रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी मोकळी जागा सोडणे बंधनकारक करण्याची शिफारस या आराखड्यातून करण्यात आली आहे़मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विकास नियोजन आराखड्याच्या प्रारूपात सुधारणा करण्यात येत आहे़ या सुधारित प्रारूप विकास नियंत्रण नियमावलीचे पाच, सहा, सात, आठ व दहा भाग रविवारी जाहीर करण्यात आले आहेत़ यामध्ये चटईक्षेत्राचा वापर, इमारतींची उंची यावर सुधारित तरतूद करण्यात आली आहे़ रस्ता आणि त्याचे बांधकाम याचा प्रकार लक्षात ठेवूनच रुंदीकरणासाठी जागा सोडण्याची सूचना यात करण्यात आली आहे़त्यानुसार, रस्ता रुंदीकरणासाठी विकासकांना कमाल २२़५ मीटर आणि किमान दीड मीटर जागा सोडावी लागणार आहे़ द्रुतगती मार्ग, तसेच ५२ मीटरपेक्षा रुंद रस्त्यांच्या बाजूला असलेल्या औद्योगिक वसाहतींना २२़५ मीटर जागा सोडावी लागणार आहे़ सर्वाधिक जागा सोडण्यासाठी औद्योगिक वसाहतींवर बंधन असणार आहे़ द्रुतगती महामार्गावर निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी एखाद्या इमारतीचा पुनर्विकास झाल्यास सहा मीटर जागा सोडावी लागणार आहे़ (प्रतिनिधी)