Join us
Daily Top 2Weekly Top 5

नकोशी म्हणून मुलीला सोडले

By admin | Updated: December 28, 2016 02:07 IST

जन्मानंतर नवजात बालिकेला रुग्णालयातच एकटे सोडून आई निघून गेल्याची घटना मंगळवारी आग्रीपाड्यात घडली. नकोशी म्हणून ती मुलीला टाकून गेल्याचा संशय पोलिसांना

मुंबई : जन्मानंतर नवजात बालिकेला रुग्णालयातच एकटे सोडून आई निघून गेल्याची घटना मंगळवारी आग्रीपाड्यात घडली. नकोशी म्हणून ती मुलीला टाकून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायर रुग्णालयात एका महिलेने मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर तिला तेथेच सोडून ती निघून गेली. या घटनेमुळे नायर रुग्णालयात खळबळ उडाली. डॉक्टरांनी महिलेचा शोध घेतला मात्र ती आढळून आली. तिने दिलेल्या घरच्या पत्त्यावरदेखील कोणी नव्हते. रुग्णालयाकडून याबाबत आग्रीपाडा पोलिसांना कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिसांनी शोध सुरू केला. तेव्हा तपासात बाळाची आई बिहारला निघून गेल्याची माहिती समोर येत आहे.नकोशी म्हणून ती मुलीला सोडून गेल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे आग्रीपाडा पोलिसांनी सांगितले. तिचे वडील पोलीस ठाण्यात आले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)