नवी मुंबई : सिडकोच्या ‘स्वप्नपूर्ती’ची सोडत शनिवारी सिडको भवन येथे होणार आहे. सिडको भवनमध्ये मोजक्याच निमंत्रकांच्या उपस्थितीत ही सोडत होणार आहे. त्यामुळे इतर अर्जदारांनी गर्दी टाळावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
सोडतीची पारदर्शक प्रक्रिया अर्जदारांना पाहता यावी यासाठी थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावर केले जाणार आहे. यशस्वी अर्जदारांना त्यांच्या मोबाइल नंबरवर मेसेजद्वारे सूचित केले जाणार आहे. संपूर्ण यशस्वी अर्जदारांची यादी 1 डिसेंबरपासून टीजेएसबी बँकेची शाखा, सिडको भवन, रायगड भवन येथे प्रदर्शित केली जाणार आहे. अयशस्वी अर्जदारांचे नोंदणी शुल्क सिडकोमार्फत 1क् डिसेंबरपासून डीडीमार्फत पाठवले जाणार आहेत.