व्यसनाचा विळखा मृत्यूनेच सुटतो़़़ असे असतानाही याला आटोक्यात आणणे अशक्य आहे़ अनेक दिग्गजांनी नाना तऱ्हेचे रामबाण उपाय यावर करून पाहिले़ तरी या स्लो पॉयझनला थांबवता आले नाही़ बालमन तर याच्या गळाला लागलीच लागते़ त्यामुळे शाळकरी मुलांना यापासून वाचवण्यासाठी ‘टीम लोकमत’ने पुढाकार घेतला आहे़ या छायाचित्रांच्या माध्यातून प्रत्येक घराचा वंश कसा नकळत नशेच्या संपर्कात येतो आहे. हे ‘टीम लोकमत’ने दाखवून दिले आहे़ तेव्हा या भयावह सत्याने तरी फडणवीस सरकारचे डोळे उघडतील का, असा प्रश्न या वेळी विचारावासा वाटतो आहे़ ‘लोकमत’ने केलेले हे रिअॅलिटी चेक पाहून प्रत्येक शाळा, त्या-त्या भागातील नगरसेवक, पालिकेचे साहाय्यक आयुक्त आणि सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रखर समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे...व्यसनाचा विळखा मृत्यूनेच सुटतो़़़ असे असतानाही याला आटोक्यात आणणे अशक्य आहे़ अनेक दिगज्जांनी नानातऱ्हेचे रामबाण उपाय यावर करून पाहिले़ तरी या स्लो पॉयझनला थांबवता आले नाही़ बालमन तर याच्या गळाला लागलीच लागते़ त्यामुळे शाळकरी मुलांना यापासून वाचवण्यासाठी ‘टीम लोकमत’ने पुढाकार घेतला आहे़ या छायाचित्रांच्या माध्यातून प्रत्येक घराचा वंश कसा नकळत नशेच्या संपर्कात येतो आहे. हे ‘टीम लोकमत’ने दाखवून दिले आहे़ तेव्हा या भयावह सत्याने तरी फडणवीस सरकारचे डोळे उघडतील का, असा प्रश्न यावेळी विचारावासा वाटतो आहे़ ‘लोकमत’ने केलेले हे रिएलॅटी चेक पाहून प्रत्येक शाळा, त्या-त्या भागातील नगरसेवक, पालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रखर समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे......माझगाव येथील आयसीएसई बोर्डाच्या सेंट मेरीज हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस शाळेच्या परिसरात बंदी असल्याचा सूचना फलक लावलेला आहे. मात्र, माझगावच्याच याच शाळेसमोर अवघ्या काही फूटांवर असलेल्या पानटपरीत तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करताना अल्पवयीन मुलगा. काही फूटांवर असलेल्या कायद्याच्या सूचनेचा या पानटपरीधारकावर काहीही परिणाम झालेला नाही, हे विशेष. भायखळा पश्चिमेतील मोमिनपुरा कंपाऊंड (कालापानी)येथील मौलाना आझाद हायस्कूलशेजारी काही फुटांवर दोन पानटपऱ्या आहेत. यातील एका पानटपरीवर सिगारेट खरेदी करताना शालेय विद्यार्थी. मालाड पूर्वेतील बछानीनगर मधील दफ्तरी रोडवरील महापालिकेच्या टोपीवाला पुष्पापार्क माध्यमिक शाळेजवळील अवघ्या काही फुटांवर असलेल्या या पानाच्या गादीवरुन अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ सर्रासपणे दिली जातात, त्याचा हा धडधडीत पुरावा. पानाच्या गादीवरुन मावा खरेदी केल्यानंतर या विद्यार्थ्यांने तो ‘लोकमत’ प्रतिनिधींना दाखविला. सर्रास होणारे हे प्रकार संबंधित यंत्रणा कशा रोखणार? हा प्रश्नच आहे. मालाडमधील कुरार व्हीलेज क्रमांक १च्या महापालिकेच्या अगदी शाळेसमोर असलेले पान शॉप स्पष्ट दिसत आहे. शाळा आणि पान शॉपमध्ये आहे तो केवळ एक रस्ता. या शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना तंबाखुजन्य पदार्थांची सवय लागण्याचा धोका आहे. मालाडमधील कुरार व्हीलेज क्रमांक २च्या महापालिकेच्या हिंदी शाळेच्या प्रवेशद्वारावरच एक पानटपरी थाटली आहे. त्यामुळे एकाही विद्यार्थ्याला व्यसन लागणार नाही, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. नायगावमधील लोकसेवा डॉ. डी. बी. कुलकर्णी शाळेच्या प्रवेशाद्वारासमोर असलेली ही पानटपरी लोकमतच्या छायाचित्रकाराने टिपली आहे. दादर पूर्वेकडील गौतम नगर येथील महापालिकेची शाळेच्या गेटसमोर पानाची गादी वर्षानुवर्षे आहे. दररोज शाळकरी मुले येथे टाईमपास करण्यासाठी उभे असतात. शालेय विद्यार्थ्यांना सिगारेट, तंबाखुजन्य पदार्थ सर्रासपणे दिले जातात. दादरच्या चित्रा सिनेमासमोरील गुरुनानक शाळेसमोर पानाची टपरी आहे. कायद्यात असलेली १०० मीटरची मर्यादा या दुकानाने पाळलेली नाही. त्यामुळे शाळकरी मुलांना तंबाखूजन्य पदार्थांच्या मोहापासून रोखणे अत्यंत कठीण आहे.अंधेरी पूर्वेतील राधाकृष्ण मार्गावर असलेल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्राथमिक शाळेसमोरील पानटपरीमधून शालेय विद्यार्थीला तंबाखूजन्य पदार्थ सर्रास दिले जात असतानाचे छायाचित्र. मालाडमधील कुरार व्हीलेज क्रमांकमधील महापालिका शाळेसमोर पानटपरी आहे. या टपरीतून शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थ देण्यात आले. हे पदार्थ या विद्यार्थ्यांनी लोकमत प्रतिनिधींना आणून दाखविले. कुरार व्हीलेजमधील शाळेसमोरील टपरीतून अल्पवयीन मुलाने खरेदी केलेली तंबाखू दाखवताना शाळकरी मुलगा.