Join us
Daily Top 2Weekly Top 5

गळती झालेल्या पेट्रोलला आग

By admin | Updated: November 14, 2014 01:25 IST

रेल्वेची सुरक्षा भिंत उभारत असताना शनिवारी कुल्र्यामध्ये भारत पेट्रोलियमची पाइपलाइन फुटली होती. कंपनीच्या कर्मचा:यांनी आणि अग्निशामक दलाने तत्काळ या पाइपलाइनची दुरुस्ती करून पेट्रोल बंद केले.

कुर्ला : रेल्वेची सुरक्षा भिंत उभारत असताना शनिवारी कुल्र्यामध्ये भारत पेट्रोलियमची पाइपलाइन फुटली होती. कंपनीच्या कर्मचा:यांनी आणि अग्निशामक दलाने तत्काळ या पाइपलाइनची दुरुस्ती करून पेट्रोल बंद केले. मात्र येथील गटारामध्ये वाहून गेलेल्या पेट्रोलची विल्हेवाट न लावल्याने आज सकाळी या ठिकाणी मोठी आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. मात्र कंपनीच्या या निष्काळजीपणामुळे रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे.
कुल्र्यातील साबळे नगर येथे पाइपलाइन फुटल्याची ही घटना शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली होती. एमएमआरडीएमार्फत बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली एका रेल्वे कंत्रटदारामार्फत या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू होते. बाजूलाच बीपीसीएल कंपनीकडून या ठिकाणी खोदू नये, असा बोर्ड लावण्यात आलेला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत कामगारांनी या ठिकाणी खोदकाम सुरू केले. याच दरम्यान जमिनीखालून जाणा:या पेट्रोलच्या पाइपलाइनवर प्रहार झाला आणि पाइपलाइन फुटली. काही वेळातच यामधून मोठय़ा प्रमाणात इंधन बाहेर येत असल्याचे या कर्मचा:यांना समजताच त्यांनी तत्काळ ही महिती त्यांच्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर त्यांनी अग्निशमन दलास ही महिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी आग लागू नये, यासाठी पाण्याची फवारणी सुरू केली. काही वेळातच या ठिकाणी भारत पेट्रोलियमचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. त्यांनी तत्काळ ही पाइपलाइन बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.  मात्र यामध्ये कंपनीचे 1क् ते 12 लाखांचे नुकसान झाले होते.
पाइपलाइनमधून निघालेले पेट्रोल परिसरातील सर्व गटारांमध्ये पसरले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने काही ठिकाणी आगरोधक रसायनांची फवारणी केली. मात्र काही गटारांमध्ये मोठय़ा प्रमाणात पेट्रोल शिल्लक होते. आज सकाळी या परिसरातील एका रहिवाशाने याच गटाराजवळ शेकोटी केली. त्याने या शेकोटीला आग लावताच संपूर्ण गटारामध्ये आग लागली. गटाराच्या बाजूलाच काही झोपडय़ादेखील आहेत. यामधील तीन झोपडय़ा या आगीत जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची महिती मिळताच त्यांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. (प्रतिनिधी)