Join us
Daily Top 2Weekly Top 5

माणगावातील अध्यापिका विद्यालयाला गळती

By admin | Updated: August 2, 2014 22:51 IST

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील शासकीय अध्यापिका महाविद्यालयाच्या इमारतीची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

गोरेगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील शासकीय अध्यापिका महाविद्यालयाच्या इमारतीची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.  
माणगाव येथे शासकीय विद्यालयाची स्थापना 2क् जुलै 1966 ला झाली तेव्हापासून एका खाजगी इमारतीत हे अध्यापिका महाविद्यालय भरवण्यात येते. इमारत  गळकी झाली आहे. इमारतीची साफसफाई न केल्यामुळे रोपटी उगवली आहे, रंग रंगोटी न केल्यामुळे तसेच पावसामुळे इमारतीच्या भिंती काळ्याकुट्ट बनल्या आहे. जोरदार पाऊस किंवा वादळ झालेच तर इमारत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. डी.एड. या अध्यापिका पदवीचे महत्व कमी झाल्यामुळे या पदवी कडे बघण्याचा विद्यार्थिनींचा दृष्टीकोनहि बदलला जात आहे. 
 मुलींसाठी असणारे हॉस्टेल सन 2क्12-13पासून इमारत खराब असल्याच्या कारणावरून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मुलींची गैरसोय होत आहे. प्राचार्य पद रिक्त आहे. सद्यस्थितीत महाविद्यालयातील प्र. प्राचार्य पद हे महाड पं. स.शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेले आहे.   यासंबंधी चौकशी केली असता, इमारत मोडकळीस आल्यामुळे कॉलेज हलविण्यासंदर्भात शिक्षण उपसंचालक यांचेकडे प्रस्ताव पाठवला आहे.  मात्र अद्याप उत्तर मिळाले नाही. अध्यापिका विद्यालयाची स्वतंत्र जागा आहे. सात बारा नुसार तीन हेक्टर जागा आहे. भूमिअभिलेख कार्यालयाकडून जागेची मोजणी करायची बाकी आहे.  असे प्र. प्राचार्य एस एच. महामुनी यांनी सांगितले. (वार्ताहर)