वैभव गायकर ल्ल नवी मुंबई
खारघर पोलीस स्टेशनसाठी सिडकोने नवीन इमारत बांधली आहे. परंतु उद्घाटन झाले नसल्यामुळे ही वास्तू धूळ खात पडून आहे. दुसरीकडे सद्यस्थितीमधील पोलीस स्टेशनमध्ये गळती होत असून कर्मचा:यांसह येथे येणा:या नागरिकांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
खारघर पोलीस ठाण्याबाहेर पावसाळय़ात नेहमी पाणी साचलेले असते. पावसाच्या पाण्यातूनच मार्ग काढत याठिकाणच्या कर्मचा:यांना पोलीस ठाणो गाठावे लागते. तसेच महत्त्वाच्या अशा गोपनीय विभागात देखील पाण्याची गळती होत आहे. महत्त्वाची कागदपत्रे भिजली तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पोलीस स्टेशनमध्ये मोठय़ाप्रमाणात गळती झाली. पोलीस स्टेशनच्या बाहेरही मोठय़ाप्रमाणात पाणी साचले होते. कर्मचा:यांची व तक्रार घेवून येणा:या नागरिकांचीही मोठी गैरसोय होत होती. सिडकोने सेक्टर 7 मध्ये नवीन इमारत उभी केली आहे. 2 हजार चौरस मीटर भूखंडावर सुसज्ज पोलीस स्टेशन उभे राहिले आहे. काही महिन्यांपूर्वीच हे बांधकाम पूर्ण झाले आहे. विद्यमान पोलीस स्टेशनची दुरवस्था झाली असताना नवीन इमारत का सुरू केली जात नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
खारघर पोलीस स्टेशनचे उद्घाटन कधी होणार याविषयी वरिष्ठ अधिका:यांशी संपर्क साधला परंतु कोणाचीही प्रतिक्रिया उपलब्ध होवू शकली नाही. मात्र मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या वास्तूचे उद्घाटन करण्याचे निश्चित केले आहे. नुकतेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार नवी मुंबईत प्रदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. परंतु या दरम्यान खारघर पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असून त्यापूर्वी उद्घाटन होणार का, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.
4विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यापूर्वी जर खारघर पोलीस स्टेशनचे उद्घाटन झाले नाही तर अजून काही महिने जुन्या पोलीस स्टेशनमध्येच कारभार सुरू ठेवावा लागणार आहे. यामुळे लवकरात लवकर उद्घाटन करावे अशी अपेक्षा या परिसरातील नागरिकांनी केली आहे.