Join us

पालिका क्षेत्रात दारूवर एलबीटी

By admin | Updated: July 6, 2016 01:27 IST

महापालिका क्षेत्रात ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या मद्य आणि मद्यार्कापासून बनविलेल्या उत्पादनांच्या व्यापाऱ्यांकडून स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसूल करण्यात

मुंबई : महापालिका क्षेत्रात ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या मद्य आणि मद्यार्कापासून बनविलेल्या उत्पादनांच्या व्यापाऱ्यांकडून स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसूल करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज हा निर्णय घेतला. आॅगस्ट २०१५ पासून राज्यातील सर्व महापालिकांमध्ये (मुंबई वगळता) एलबीटी रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मद्य व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा झाला होता. आता त्यांना एलबीटी द्यावा लागणार आहे. एलबीटी रद्दच्या निर्णयामुळे मोठा आर्थिक भार राज्य शासनाला सध्या सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, दारुच्या माध्यमातून एलबीटी परतल्याचे दिसते. (विशेष प्रतिनिधी)- एलबीटी रद्द ्रकरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मद्य व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा झाला होता. मात्र आता त्यांना एलबीटी द्यावा लागणार आहे.