Join us

वकील, पोलीस आणि मायकल...

By admin | Updated: March 13, 2015 01:19 IST

एखाद्या व्यक्तीला कायदेशीर मदत हवी असेल, तर तो वकिलाकडे धाव घेतो. मात्र जेव्हा एखादा वकीलच कायद्याच्या कचाट्यात सापडतो, ते

मुंबई : एखाद्या व्यक्तीला कायदेशीर मदत हवी असेल, तर तो वकिलाकडे धाव घेतो. मात्र जेव्हा एखादा वकीलच कायद्याच्या कचाट्यात सापडतो, तेव्हा त्याची काय अवस्था होते? असाच धक्कादायक प्रकार वांद्रे पूर्वेकडील निर्मलनगर पोलीस ठाण्यात घडला आहे.पीडित अ‍ॅड. कपिल अशोककुमार राठोर यांनी सांगितले की, ५ मार्चला दुपारच्या वेळी वांद्रे कौटुंबिक न्यायालयातून घरी परतत असताना प्रवासी रिक्षात मायकल या सहप्रवाशासोबत त्यांची वादावादी झाली. वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ रिक्षातून उतरल्यावर या वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. शरीराने मजबूत असलेला मायकल मारहाण करत असल्याचे पाहून जमलेल्या जमावाने वाचवले. मात्र घडला प्रकार पाहून घटनास्थळी पोहचलेल्या हवालदाराने दोघांनाही दुपारी साडेबारा वाजता निर्मलनगर पोलीस ठाण्यात नेले. तिथे मायकलने त्याचा गुन्हा कबूल केला. अपशब्द वापरल्याकारणाने मारहाण केल्याचेही त्याने सांगितले. रिक्षाचालकानेही मायकलविरोधात साक्ष दिली.पोलिसांना मायकलविरोधात तक्रार नोंदवण्याची विनंती केल्यानंतर मायकल आणि पोलिसांची फोनाफोनी सुरू झाली. झाला प्रकार विसरून राठोर यांनी तक्रार नोंदवू नये, असे आवाहन खुद्द पोलिसच करू लागल्याचे राठोर यांचे म्हणणे आहे. मात्र दोघांविरोधातही तक्रार नोंदवली तरी चालेल, असा पवित्रा राठोर यांनी घेतल्याचे सांगितले. राठोर म्हणाले की, संबंधित अधिकाऱ्याला विचारणा करण्याऐवजी वरिष्ठांनी फिर्यादीविरोधातच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकाराबाबत मुंबई पोलीस सहआयुक्तांपासून बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे सचिवापर्यंत संपर्क साधला. मात्र कोणीही मदत केली नाही. (प्रतिनिधी)