Join us  

'कायदा सर्वांसाठी समान, मुख्यमंत्री आता स्वत:ला अटक करुन घेणार का?'

By महेश गलांडे | Published: November 09, 2020 5:42 PM

मनोज हा परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी साडे आठ वाजले तरी वरच्या मजल्यावरुन खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले.

ठळक मुद्देमनोज हा परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी साडे आठ वाजले तरी वरच्या मजल्यावरुन खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले

मुंबई - एसटी महामंडळातील कमी पगार, अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेल्या मनोज अनिल चौधरी (३०, रा.कुसुंबा, ता.जळगाव) या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून त्यात एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर, विरोधी पक्षाने ठाकरे सरकारला लक्ष्य केलंय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री स्वत:ला अटक करुन घेणार का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. 

मनोज हा परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी साडे आठ वाजले तरी वरच्या मजल्यावरुन खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले. शेजारीच त्याने एका वहीच्या पानावर सात आठ ओळींची चिठ्ठी आढळून आली. भाऊ व मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी भाऊ, पत्नी व इतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर असलेल्या कर्तव्यनिष्ठ एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन या राज्य सरकारने अजूनही थकवून ठेवले आहे. आधीच आर्थिक परिस्थिती ढासळली असताना वेळेवर वेतन नाही, तर कुटुंबाला पोसायचं कसं? या चिंतेमुळे राज्यातील अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. यावेळी एका आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्याने ठाकरे सरकारचा उल्लेख आपल्या सुसाईड नोटमध्ये करून तेच आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी भाजपा नेत्यांनी ठाकरे सरकारला प्रश्न विचारले आहेत. 

मुख्यमंत्री आता स्वतःला अटक करून घेणार का ? चंद्रकांत पाटील यांनी अर्णब गोस्वामींच्या घटनेचा संदर्भ देत मुखयमंत्री स्वत:ला अटक करुन घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ''आता जुन्या गोष्टी उकरून काढून पत्रकार अर्णब गोस्वामी तुरुंगात डांबणारे मुख्यमंत्री स्वतःचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आल्यानंतर स्वतःला अटक करवून घेणार आहेत का? याच उत्तर त्यांनीच द्यावं. त्यात आपले परिवहन मंत्री अनिल परब जे या गोष्टींवर कधीही काही बोलत नाहीत, मात्र इतर विषयांवर माथेफोडी करण्यासाठी त्यांना वेळ असतो. कायदा सगळ्यांसाठी समान आहे, मात्र आता मुख्यमंत्री कारवाई करणार की नाही? मुळात गोस्वामी यांच्या अटकेमुळे राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. राज्य सरकार जनतेनंतर, शेतकऱ्यांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्याही जीवावर उठले आहे. त्यामुळे त्यांचा हा निष्काळजीपणा आता त्यांनाच भोवणार आहे.'', असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. 

देवेंद्र फडणवीसांचाही सरकारला सवाल?

चौधरी यांच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला प्रश्न केले आहेत. ''वेतन न मिळाल्याने 2 एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या,या अतिशय वेदनादायी,मनाला अस्वस्थ करणार्‍या घटना आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही 2 कुटुंब उघड्यावर आली आहेत. आता तरी सरकारने जागे व्हावे. एसटी कर्मचार्‍यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत. जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार? या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का?, असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. 

टॅग्स :चंद्रकांत पाटीलउद्धव ठाकरेशिवसेनाआत्महत्या