Join us
Daily Top 2Weekly Top 5

लता मंगेशकर यांचा सांगीतिक वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:06 IST

मुंबई : लता मंगेशकर यांचा २८ सप्टेंबर रोजी ९१वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने, हॅपी लकी एंटरटेन्मेंटने त्यांचा सांगीतिक वाढदिवस साजरा ...

मुंबई : लता मंगेशकर यांचा २८ सप्टेंबर रोजी ९१वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने, हॅपी लकी एंटरटेन्मेंटने त्यांचा सांगीतिक वाढदिवस साजरा करायचे ठरविले आहे. या कार्यक्रमाचे नाव ‘दीदी और हम’ असे असून, त्याची संकल्पना मानद संचालक संजय यांची आहे. कार्यक्रमात २८ वेगवेगळ्या संगीतकारांची, वेगवेगळ्या चित्रपटातील बहुतांश हिंदी गाणी आणि काही मराठी गाणी सादर करण्यात येतील. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्यासह गायिका बेला सुलाखे व संजीवनी भेलांडे या कार्यक्रमात सहभागी होतील. संगीत संयोजन अविनाश चंद्रचूड करत असून, संगीतकार नितीन शंकर हे वाद्यवृंद संचालन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे गौरव करणार असून, कार्यक्रमाची संहिता संजय यांनी लिहिलेली आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यू-ट्यूब चॅनलवर दिसणार असून, ते सगळ्यांसाठी विनामूल्य आहे.