Join us

लास्ट लोकल आणि धावपळ!

By admin | Updated: December 21, 2014 01:11 IST

शनिवारी रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणारी कर्जत फास्ट लास्ट लोकल पकडण्यासाठी उपनगरातील प्रवाशांची धावपळ उडाली.

शनिवारी रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणारी कर्जत फास्ट लास्ट लोकल पकडण्यासाठी उपनगरातील प्रवाशांची धावपळ उडाली. शेवटची गाडी सुटू नये आणि शनिवारची संपूर्ण रात्र रेल्वे फलाटावर काढावी लागू नये; म्हणून रात्री उशिरा कार्यालयातून घरी परतणारे मुंबईकर अक्षरश: लास्ट लोकलवर तुटून पडले. आणि हीच लास्ट लोकल पकडत घरी जाता यावे म्हणून भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर आणि ठाणे या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती.