Join us

कारागीर फिरवताहेत शेवटचा हात

By admin | Updated: August 22, 2014 23:22 IST

वसई परिसरात बाप्पा भक्तांच्या घरी येण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील कारागीर बाप्पांच्या कलाकुसरीवर शेवटचा हात फिरवण्यात मग्न आहेत.

सुनील घरत - पारोळ
वसई परिसरात बाप्पा भक्तांच्या घरी येण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील कारागीर बाप्पांच्या कलाकुसरीवर शेवटचा हात फिरवण्यात मग्न आहेत.
गणोशोत्सव हा महाराष्ट्रातील सांस्कृतिक उत्सव आहे, त्याचप्रमाणो देव माङया घरात दीड, पाच, सात, अकरा दिवस राहायला येणार आहे. याचाही आनंद गणोश भक्तांमध्ये असतो. या दिवसात ग्रामीण भागात भजनाचे सूर घुमू लागतात. त्याचप्रमाणो महिलाही गौराईमातेच्या आगमनाने खूश असतात. बालगोपाळ बाप्पांसाठी कोणती आरास करायची याची चिंता त्यांना सतावत असते. अशा या भक्तीपूर्ण वातावरणाला काही दिवस बाकी आहेत व बाप्पा  भक्तांची वाट पहात आहेत. 
 
ग्रामीण भागातील गणोश कार्यशाळेत 1क्क्क् ते 16क्क्क् हजारांर्पयत गणोशमूर्तीच्या किमती असून यावर्षी कलर, प्लॅस्टर ऑफ पॅरीस, माती, कलाकुसरीसाठी लागणा:या वस्तू महागल्याने गणोशमूर्तीच्या किमतीत 5 ते 1क् टक्कय़ांनी वाढ झाली आहे. तरीही गणोशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून तरूण, आबालवृद्ध गणोश आगमनाची वाट पाहत आहेत.
 
या वर्षी परिसरातील कार्यशाळेत अनेक प्रकारच्या बाप्पांच्या सुबक मूर्ती बनवल्या आहेत. त्यामध्ये सिंहासनावर बसलेले बाप्पा, उंदरावर बसलेले बाप्पा, लालबागचा राजा, दगडुशेठ हलवाई गणपती, खंडोबारायाच्या अवतारात मूर्ती बनवल्या गेल्या आहेत.