Join us
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

By admin | Updated: June 14, 2015 02:03 IST

अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची १५ जून ही अंतिम तारीख आहे. शनिवारी मंजुरी मिळालेल्या अर्जांची संख्या १ लाख ३१ हजार १९१ पोहचली आहे,

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची १५ जून ही अंतिम तारीख आहे. शनिवारी मंजुरी मिळालेल्या अर्जांची संख्या १ लाख ३१ हजार १९१ पोहचली आहे, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातून सांगितले.आॅनलाईन सादर केलेले अर्ज तपासून त्रुटी दुरुस्त करत अद्ययावत करण्यासाठी १६ जून ही अंतिम तारीख आहेत. तर २० जून रोजी सायंकाळी ५ वाजता सर्वसाधारण गुणवत्ता यादी घोषित करण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर, मुंबई पश्चिम, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर आणि भिवंडी निजामपूर या महानगर प्रदेशातून आॅनलाईन अर्ज दाखल केले जात आहेत.