Join us
Daily Top 2Weekly Top 5

विवाह मंडळ नोंदणीचा शेवटचा दिवस

By admin | Updated: May 5, 2016 02:30 IST

महापालिका क्षेत्रातील विवाह जुळविणारी वधुवर सूचक मंडळे किंवा व्यक्तींची नोंदणी महापालिकेकडे करणे आवश्यक असून, त्यानुसार २४ विभाग कार्यालयांमध्ये वधुवर सूचक मंडळे

मुंबई : महापालिका क्षेत्रातील विवाह जुळविणारी वधुवर सूचक मंडळे किंवा व्यक्तींची नोंदणी महापालिकेकडे करणे आवश्यक असून, त्यानुसार २४ विभाग कार्यालयांमध्ये वधुवर सूचक मंडळे किंवा व्यक्ती यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व विवाह मंडळांना महापालिकेतील विवाह निबंधकाकडे ५ मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून यापूर्वी करण्यात आले होते. त्यानुसार नोंदणीसाठी विवाह मंडळाकरिता आजचा (गुरुवार) अंतिम दिवस आहे. यासंदर्भातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास ५ हजार रुपये दंड व ६ महिन्यांपर्यंतचा कारावास होऊ शकतो. (प्रतिनिधी)