भार्इंदर : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या कॅन्टीनमधील पिण्याच्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. या घटनेची तक्रार याच कार्यालयातील सामान्य शाखेकडे करण्यात आली आहे. मीरा रोड येथील काशिमीरा परिसरात राहणारे नामदेव काशीद (३२) हे बुधवारी शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. दुपारी ते कार्यालयातील कॅन्टीनमध्ये जेवणासाठी गेले होते. त्या वेळी तेथील वेटरने त्यांना दिलेल्या पिण्याच्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळून आल्या. काशीद यांनी अळ्यांचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून त्याची लेखी तक्रार या कार्यालयातील सामान्य शाखेकडे केली आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅन्टीनमधील पाण्यात अळ्या
By admin | Updated: May 8, 2015 22:52 IST